“तो कुठेतरी करणीभूत ठरला ती बाहेर जाण्यासाठी”

नवा आठवडा नवे टास्क...!

0

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामधून काल स्नेहा वाघ घराबाहेर पडली. आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा… घरामध्ये रंगणार नवे टास्क… होणार राडे, बघायला मिळणार कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या विरोधात. नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण होणार नॉमिनेट आणि कोण कोणाला करणार सेफ. तसेच आठवड्याच्या शेवटी घराला मिळणार नवा कॅप्टन. कालसमोर आलेल्या प्रोमोमधून असू दिसून येत आहे, बिग बॉस मराठीच्या घराचे आता मुंबई शहारात रूपांतर होणार आहे.

बिग बॉस यांनी दिला सदस्यांना नवा आणि कठीण टास्क. त्यांनी जाहीर केले, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना जागं राहावं लागणार आहे. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की ! उत्कर्ष त्यावर लगेच गाणं म्हणायला लागला… मुझे निंद क्यु आये, कोई मुझको अब ये बताये… के ऐसा कैसा टास्क आगया !

टीम्सध्ये सुरू आहे नॉमिनेशन टास्कबद्दल चर्चा…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आणि याच संदर्भातील आज विकास आणि विशाल तर दुसरीकडे जय, मीरा आणि उत्कर्षची चर्चा सुरू आहे.

जयचे म्हणणे आहे, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही मला आणि दादूसला तर नॉमिनेट करणार नाही. जो नॉमिनेट झालेला सदस्य आहे तो तुमच्यासोबत धावणार… परत दुसर्‍या राऊंडमध्ये तुमच्याकडेच येणार आहे. तुम्हांला दोघांनाच उचलायचे आहे ते. नॉमिनेट सदस्य असूनदेखील तुम्ही उचल तर तुम्ही आम्हांला नॉमिनेट नाहीच करणार आहे. तुम्ही यांच्यामधलं एक ट्राय करणार ना ? उत्कर्ष म्हणाला, fair आहे तू पळ… मीरा म्हणाली मी धावणार पण… जय म्हणाला, सोनालीला कर हा … मीरा म्हणाली मी तेच करणार आहे. उत्कर्ष म्हणाला, तिचं उचलणार कोण हा मुद्दा आहे… जय म्हणाला कोणीपण उचलू दे …

तर दुसरीकडे, विकास आणि विशाल यांचीदेखील चर्चा सुरू आहे… विकास विशालला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटतं तो सोनाली किंवा मीनलला करेल. विशाल म्हणाला, आपण समजा दादूस यांना घेतलं तर ? विकास म्हणाला, तर तो approve नाही करणार.

“तो कुठेतरी करणीभूत ठरला ती बाहेर जाण्यासाठी”– विकास

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज विकास आणि विशालमध्ये आज एक चर्चा चांगलीच रंगणार आहे. काल घरामधून स्नेहा वाघ बाहेर पडली आणि त्याच संदर्भात हे दोघे बोलताना दिसणार आहेत.

विशाल विकासला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटलं होतं जय हर्ट होईल खूप. बेस्ट बॉन्ड बनून वैगरे मी बघितलं… म्हणजे ते स्नेहाकडून दिसतं होतं खूप, माझ्याशी स्नेहा किती तरीवेळा येऊन बोली जयविषयी. मुख्यत: नॉमिनेशन झाल्यापासून की त्यांना किती वाईट वाटेल त्यांच्या कॅप्टन्सीसाठी मी झाले नॉमिनेट अणि त्यांच्यामुळे घरी जाणार… समजा मी गेलेच तर. त्या जेवढा विचार करत होत्या ना, कशी हालत होईल जयची आणि सगळं… जाताना पण त्यांनी मला खुणावलं सांभाळा त्यांना अशा पध्दतीने. कशाला सांभाळा आणि सगळं ? विकास त्यावर म्हणाला, नाही ही गोष्ट माझ्यापण लक्षात नव्हती की, ती नॉमिनेट त्याच्यासाठी झाली होती. आणि आता तो कुठेतरी कारणीभूत ठरला ती बाहेर जाण्यासाठी…

बघूया आज घरामध्ये अजून काय काय घडलं. ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.