नाशिक-रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीतर्फे अध्यक्ष रोट.राजेश सिंघल यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने “एक छोटी सी आशा” या प्रकल्पांतर्गत गरजू महिलांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले.
डीजीएन रोट. आशा वेणुगोपाल आणि एजी रोट.भावना ठक्कर यांच्या हस्ते वीस महिलांना बिनव्याजी आठ हजारापर्यंतचे धनादेश वितरीत करण्यात आले.पुढील वर्षापर्यंत सुमारे शंभर महिलांना अशी मदत करण्याचे क्लबचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले.ही रक्कम या महिलांनी स्वयंरोजगारासाठी भांडवल म्हणून वापरायची आहे.
यामध्ये टेलरिंग,खानावळ,ब्युटी पार्लर,मेहंदीकोन इत्यादी स्वरोजगार उद्योग यातून या महिला सुरू करू शकतात.हेमलता सिंघल,अमोल कलंत्री, ओंकार महाले,आरती पाटील,मेघना नाथे,रोहित सागोरे,डॉ प्रतिभा बोरसे,डॉ प्रणीता गुजराथी,हेमंत पमनानी,किरण सागोरे यांनी एकत्र येत या निधीसाठी योगदान दिले.डॉ मेघना नाथे यांनी सुत्र संचलन केले तर दिले. सचिव डॉ.संगीता लोढा यांनी आभार मानले.