मुंबई- बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत.या आठवड्यात कोल्हापूरची सोनाली पाटील घऱातून बाहेर पडली आहे.
आता बिग बॉसच्या घऱात विशाल निकम, विकास पाटील, मीनल शहा तसेच मीरा जगन्नाथ, जय दुधाणे व उत्कर्ष शिंदे ही मंडळी उरली आहे. आता बिग बॉसला त्याचे टॉप सिक्स मिळाले आहेत. आता शेवटच्या आठवड्यात खेळ अधिक रंजक होणार आहे. आता या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बॉसच्या घरात बी टीमचे सदस्य सोनाली, विशाल, विकास आणि मीनल यांच्यातील घट्ट मैत्री पाहायला मिळाली. सोनाली तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत होती.आता सोनाली आज या घरातून बाहेर पडली आहे.
आपल्या आवडीचा सदस्य निवडण्यासाठी व्होटिंग लाईन या बुधवार पर्यंत खुल्या राहणार आहेत.आता या आठवड्यात घऱात बाहेर कोण पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्रॉफीच्या जवळ येऊन असं एका आठवड्यासाठी घराच्या बाहेर पडणं त्या स्पर्धकासाठी शॉकिंग आहे. पण खेळाचा नियम आहे आणि शेवटी एकच विजयी ठरणार आहे.