महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा स्थगित !

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची लवकर घोषणा होणार

0

मुंबई संपूर्ण महाराष्ट्रातील रंगकर्मीचे लक्ष लागून असलेली येत्या १५ जानेवारी पासून सुरु होत असलेली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचानालया तर्फे आयोजित मराठी  राज्य नाट्य स्पर्धा  ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून  घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्यनाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारी पासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात येत आहे.

या स्पर्धे मधे महाराष्ट्रातून अनेक संघांनी सहभाग घेतला होता. कोव्हिड काळात स्पर्धा झाल्या नाहीत. म्हणून अतिशय उत्साहात सर्व कलावंतांनी जल्लोषात स्वागत केले. परंतु वारंवार कोव्हिडचे सावट काही केल्या दुर होताना दिसत नाही. आता बदललेला शासनाचा पवित्रा स्पर्धेच्या  मुळावर उठला आहे. संघांची झालेली तयारी, खर्च आणि त्याहुनही झालेला उत्साह भंग परत निराशेच्या गर्तेत लोटणारा आहे.

सर्व नियम कायदे काटेकोरपणे पाळले जाणारे होते. स्पर्धाकांचे व्हॅक्सिनेशन  देखिल पुर्ण झाले होते. ५०% चा नियमही मान्य असताना अशी माघार कलावंतांना मान्य नाही.अशा प्रतक्रिया कलावंतांमधून उमटता आहेत. पुन्हा वेळ काढणे खर्च करणे आणि एवढं सगळं करून टांगती तलवार कायम राहील अशी भावना संघांनी व्यक्त केली आहे. या पुढे हि स्पर्धा करावी की नाही या विचारार्थी स्पर्धक ठेपले आहेत.

स्पर्धा कधी होणार आणि केव्हा होणार या बाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.