मनेगाव,बारागाव पिंप्री सोलर उर्जेच्या २१ कोटींच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

0

सिन्नर- तालुक्यातील गाव समूहांच्या प्रादेशिक नळ योजनेचा समावेश असलेल्या मनेगाव व बावीस गावे आणि बारागाव पिंप्री व सहा गावे पाणीपुरवठा योजनेचा सतत खंडित होणाऱ्या वीज चा प्रश्न निकाली लावण्यासाठी खासदार गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. थकित विज बिलांमुळे सतत खंडित होणाऱ्या विजपुरवठ्यावर पर्याय म्हणून खा. गोडसे यांनी गावशिवारात सोलर उर्जा प्रकल्प उभारण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राधिकरणाला केल्या होत्या .याविषयी महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविलेल्या एकवीस कोटींच्या वरील दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकिय मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे आता बारागाव पिंपरी व सहा गावे तसेच मनेगाव व बावीस गावे पाणी पुरवठा योजनेच्या सौर उर्जा प्रकल्पाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

सिन्नर तालुक्यातील मनेगावसह तेवीस गाव पाणीपुरवठा योजना , बारागाव पिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना, ठाणगावसह सहा गाव पाणीपुरवठा योजना, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना, मिठसागरे पंचाळेसह बारा गाव पाणीपुरवठा योजना, नायगावसह दहा गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना या गावाच्या समुहांचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश झालेला आहे.

वीज मंडळाकडून येणारे अव्वाच्यासव्वा वीजबिले आणि पाणीपट्टी पोटी प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम यामध्ये खुपच तफावत असते. यामुळे विजबिले भरली जात नाहीत. यातूनच वीजमंडळाकडून पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा खंडित होतो. या विषयी गावक-यांकडून आलेल्या तकारींची दखल घेत खा.गोडसे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विशेष पत्र धाडूनपाणी पुरवठा योजनेच्या वीजबिलावर पर्याय म्हणून गावशिवारातील जागेवर सोलर प्लांट उभारण्याच्या सुचना प्राधिकरणाला केल्या होत्या .

खा.गोडसे यांच्या सोलर प्लांट उभारण्याविषयीच्या सुचनांची दखल घेत प्राधिकरणाने लगेचच प्रत्यक्ष कार्यवाही करण्यास सुरूवात करून मनेगाव व बारागाव पिंप्री येथील पाणीपुरवठा समितीकडून सोलर प्लांट उभारण्याच्या जागेसंदर्भातील प्रस्तावाची मागणी केली होती. गावसमुहांकडून आलेल्या मागणी प्रस्तावाच्या आधारावर गावशिवारात सोलर प्लांट उभारणीकामी प्राधिकरणाने सविस्तर अहवाल तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

बारागाव पिंप्री व सहा गावे पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी १५ लाख तर मनेगाव व बावीस गावे योजनेसाठी ९ कोटी ५५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सदर प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खा.गोडसे यांनी वेळोवेळी पाणी नामदार पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा विभागाचे सचिव जयस्वाल यांची भेट घेवून पाठपुरावा सुरू केला होता. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने नुकतीच राज्य शासनाने वरील दोनही गाव समुह पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रशासकीय मान्यतेमुळे गाव समुहांच्या सोलर उर्जा प्रकल्पाचा प्रश्न लगेचच मार्गी लागणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.