नाशिक शहराला होणार नियमित पाणी पुरवठा : शहरातील पाणी कपात रद्द

1

नाशिक – नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून बुधवारी सुरु असलेली पाणी कपात रद्द केली असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.आज झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आज मितीस ७६.१८ टक्के भरले आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे दारणा आणि मुकणे धरणाची स्थिती हि समाधानकारक असल्याने नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून दर बुधवारी सुरु असलेला पाणी कपातीचा निर्णय स्थगित केला असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

https://youtu.be/fWiPHjrD9ao

काही दिवसापूर्वी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ४० दिवस पुरेल एकदाच पाणी साठा उपलब्ध होता.परंतु नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर ,दारणा मुकणे आणि भावली धरणाच्या क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नाशिककरांवर ओढवलेले पाण्याचे संकट आता टळले आहे.

पाणी कपात जरी रद्द झाली असली तरी नाशिकरांनी पाणी जपून वापरावे असेही आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. दिलीप पांडुर्लीकर says

    पाणी कपात रद्द झाल्या बदल धन्यवाद. पण पाण्याचे प्रेशर पाहिजे तसे येत नाही. तरीही नम्र विनंती प्रेशर वाढवावे.

कॉपी करू नका.