ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक, कृष्ण, त्रयोदशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज प्रतिकूल दिवस आहे. *प्रदोष, शिवरात्री* आहे.
चंद्र राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भागीदारी व्यवसायात अधिक लक्ष घालावे लागेल. शत्रू डोके वर काढतील.
वृषभ:- उत्तम भौतिक लाभ मिळतील. मौल्यवान खरेदी होईल. शत्रू पराभूत होतील.
मिथुन:- संततीशी मतभेद संभवतात. त्यांना समजून घ्या. धाडस अंगाशी येईल. जपून पावले टाका.
कर्क:- घरापासून दूर जावे लागेल. स्वप्ने काहीशी रेंगाळतील. कामे पूर्ण होण्यास वाट बघावी लागेल.
सिंह:- भावंड मदत करतील. प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ होतील.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल. सूचक घटना घडतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
तुळ:- हुरहूर वाढेल. अस्वस्थ वाटेल. अति आत्मविश्वास नको. वाद विवाद टाळा.
वृश्चिक:- मानसिक त्रास होईल. घरात कुरबुरी होतील. विनाकारण खर्च वाढेल. सरकारी कामात त्रास संभवतो.
धनु:- गृहसौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. प्रगती होईल. आर्थिक लाभ मिळतील.
मकर:- मातेकडून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी कटकटी होऊ शकतात. संध्याकाळ आनंदात घालवाल.
कुंभ:- आनंदी दिवस आहे. कुटुंबसुख लाभेल. मन आनंदी राहील. शेअर्स मधून मात्र नुकसान संभवते.
मीन:- फारसा अनुकूल दिवस नाही. पोटाचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)