गुरुवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

0

नाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथील तसेच मुकणे धरण विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातुन जाणारी मुख्य पाईप लाईन दुरुस्ती काम तातडीने करायचे असल्याने गुरुवार दिनांक २० जानेवारी २०२२

रोजी नाशिक शहराला होणारा पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती नाशिक महानगर पालिकेचे अधीक्षक अभियंता (पा) यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

गंगापुर धरण पंपिंग पंपिंग स्टेशन येथील मिटरींग क्युबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट व सबस्टेशन पॅनल रुममधील फिडरचे इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट, वीज वितरण कंपनी बाजुकडील सिक्स पोल स्ट्रक्चरवरील ३३ के.व्ही. इनकमिंग व आऊटगोईंग जंपर बदलणे तातडीची बाब आहे. तसेच मुकणे धरण विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातुन जाणारी मुख्य पाईप लाईन दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने सदर दुरुस्ती कामासाठी गुरुवार दिनांक २०/०१/२०२२ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपावेतो एकुण ८ तासांसाठी शटडाऊन आवश्यक आहे.

सबब मनपाचे गंगापुर धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून शहरास होणारा रॉ.वॉटर पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने संपुर्ण शहराचा गुरुवार दि.२०/०१/२०२२ रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच दि.२१/०१/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी अशी विनंती.नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.