“Knock Out” नॉमिनेशन कार्यासाठी काय आहे विकास, मीनल आणि सोनालीचं प्लॅनिंग…
बिग बॉस च्या घरामध्ये सुरू होतो आहे फॅमिली वीक.
मुंबई -बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य. Top 8 पर्यंत पोहचल्यावर ही स्पर्धा अधिकच कठीण होत जाणार हे निश्चित…इथवर पोहचल्यानंतर कोणत्याच सदस्याला आता नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर नको आहे. आणि त्यामुळे आता प्रत्येक सदस्य यातून स्वत:ला कसं वाचवता येईल यावर लक्ष केंद्रीत करताना दिसणार आहेत. आज टास्क दरम्यान विकास, सोनाली आणि मीनल चर्चा करताना दिसणार आहेत.
विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, दोन गोष्टी आहेत लक्षात ठेव, तुझ्याकडे उत्कर्ष येणार तो बोलणार तू माझं टाकू नकोस मी तुझं नाही टाकत. तो येणार तुला म्हणणार माझं टाकू नकोस, मीराचं टाकू नकोस मी तुझं टाकतं नाही. तू काय म्हणायचं असं झाल्यावर कोणीच जाणार नाही. मग हक्क कोणाकडे येणार संचालकाकडे. संचालक कोणाचं नावं घेणार सोनालीचं. हे जरा लक्षात घे. आणि मग ठरवं. विशालने आता परत खूप मोठी चूक केली. मीनल त्यावर म्हणाली, त्याने परत तीच चूक केली. जर त्याने कोणा दुसर्यासोबत डील केली असती ना तर गोष्ट वेगळी आहे. जयने म्हणून ही डील केली… पण जर त्याला असं करायचं आहे तर करू दे. विकास म्हणाला, करू दे… आता येणारचं ना कॅप्टन्सी टास्क आणि त्याला टाकू आपल्या टीममध्ये… नक्की जयने आणि विशालने काय डील केली? आणि विशालची डील जयने स्वीकारली ? आणि स्वीकारली तर का ? ही आजच्या भागामध्ये कळेलच.
विकास इथे बोलताना बोलून गेला आपल्या टीममध्ये टाकू दे त्याला. म्हणजे यांचा ग्रुप तुटला म्हणायचं का ? नक्की काय होणार या टास्कमध्ये ? कोण होणार सेफ ?
बिग बॉस मराठी – फॅमिली वीक !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य आता जवळपास ९ आठवडे राहिले आहेत आणि आता सुरू झाला आहे १० वा आठवडा… आपल्या परिवारापसून दूर, कोणताही संपर्क न साधता बिग बॉसच्या घरामध्ये तब्बल ६५ दिवसाहून अधिक दिवस रहाणं काही सोपं नाहीये. आणि म्हणूनच हा आठवडा सदस्यांसाठी त्यांच्या या प्रवासावातील अविस्मरणीय आठवडा ठरणार आहे. कारण सुरू होतो आहे फॅमिली वीक… सदस्यांना भेटायला येणार आहेत त्यांच्या परिवारातील सदस्य. या दिवसाची वाट सदस्य खूप दिवसांपासून बघत असतात. घरातील सदस्य भेटून गेल्यावर पुन्हा जोमाने खेळण्याची उभारी, नवी ऊर्जा मिळते असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे शब्द त्यांना हिंमत देऊन जातात.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना बिग बॉस फ्रीज होण्याचा आदेश देत आहेत. तुम्हांला तर कळालंच असेल आता काय होणार आहे. सदस्यांची अखेर त्यांच्या कुटुंबियांशी भेट होणार आहे. विकासला भेटायला त्याची बायको घरामध्ये जाणार आहे. गायत्री, विशाल यांना अश्रु अनावर झाले. विकासने त्याच्या मुलाची चौकशी केली. अजून काय काय गप्पा मारल्या, कोणत्या गोष्टी शेअर केल्या, बायकोने त्याला काय संदेश दिला बघूया आजच्या भागामध्ये.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.