इन्फिनिक्सचे नोट ११ व नोट ११ एस गेमिंग स्मार्टफोन्स लाँच

0

मुंबई – लोकप्रिय नोट १० सिरीजला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स हा ट्रान्सियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड आता भारतामध्ये बहुचर्चित नोट ११ सिरीजचे अनावरण करण्यास सज्ज आहे. प्रिमिअम व शक्तिशाली गेमिंग फोन्स म्हणून आपले स्‍थान प्रबळ करणारा नोट ११एस (६/६४ ; ८/१२८) २० डिसेंबरपासून अनुकमे १२,९९९ रूपये व १४,९९९ रूपये या सुरूवातीच्या किंमतींमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसेच नोट ११ (४/६४) २३ डिसेंबरपासून ११,९९९ रूपये या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल.

नोट ११ व नोट ११एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये उच्चस्तरीय वैशिष्ट्ये, उच्च दर्जाचे गेमिंग तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस आणि विशाल क्षमतेची बॅटरी आहे, ज्यामधून ग्राहकांना सर्वसमावेशक स्मार्टफोन अनुभव मिळेल. नोट ११ ४ जीबी / ६४ जीबी आणि ग्लेशियर ग्रीन, सेलेस्टियल स्नो, ग्रॅफाईट ब्लॅक या तीन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. नोट ११एस ६ जीबी रॅम / ६४ जीबी व ८ जीबी रॅम / १२८ जीबी स्टोरेज पर्याय या दोन मेमरी व्हेरिएण्ट्समध्ये, तसेच सिम्फोनी सियान, हेझ ग्रीन व मिथ्रिल ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.

इन्फिनिक्सचा नोट सिरीजमधील नवीन स्मार्टफोन नोट ११ ६.७ इंच एफएचडी+ एएमओएलईडी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन क्षेत्रातील पहिला डिवाईस असेल. यामधून हाय रिझॉल्युशन किंवा ४के व्हिडिओज पाहताना स्क्रिनवर आकर्षक रंगसंगती निर्माण होण्याची खात्री मिळेल. नोट ११एस मध्ये ६.९५ इंच पंच-होल एफएचडी+ डिस्प्ले आहे, जे १२० हर्टझचे अल्ट्रा-स्मूद रिफ्रेश रेट देते ज्यामधून गेमर्ससाठी युजर्सच्या हाताची बोटे व स्क्रिनदरम्यान अत्यंत सुलभ इंटरॅक्शन होण्याची खात्री मिळते.

प्रो-लेव्हल गेमर्सच्या सर्व गरजा लक्षात घेत इन्फिनिक्स नोट ११ मध्ये प्रगत मीडियाटेक हेलिओ जी८८ प्रोसेसर आहे. किफायतशीर दरातील विभागामध्ये असे शक्तिशाली प्रोसेसर असलेले भारतातील हे तिसरे डिवाईस आहे. या शक्तिशाली प्रोसेसरची सीपीयू गती जवळपास २ गिगाहर्ट्झ आहे. नोट ११एस शक्तिशाली मीडियाटेक हेलिओ जी९६ प्रोसेसर असलेला या विभागातील दुसरा डिवाईस आहे. ज्यामधून उच्च दर्जाच्या गेमिंग कार्यक्षमतेची खात्री मिळते. गेमिंग कार्यक्षमता नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी दोन्ही डिवाईसेसमध्ये डार-लिंक २.० गेम बूस्‍ट तंत्रज्ञान आहे. तसेच दोन्ही डिवाईसेसमध्ये युनिक सुपरकूल यंत्रणा आहे. नोट ११एस मध्ये हॅप्टिक फिडबॅक लिनियर मोटर आहे, जी वास्तविक गेमिंग अनुभव देते.

नोट ११ मध्ये ४ जीबी / ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह एलपीडीडीआर४एक्स रॅम आहे. तसेच नोट ११एस दोन मेमरी व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल: ६ जीबी रॅम / ६४ जीबी आणि ८ जीबी / १२८ जीबी स्टोरेज पर्यायांसह एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि सर्वोत्तम वाचन व लेखन गती, तसेच मल्टी-टास्किंगसाठी यूएफएस २.२ स्टोरेज तंत्रज्ञान आहे.

दोन्ही डिवाईसेस आधुनिक अँड्रॉईड ११ सह आधुनिक एक्सओएस ७.६ स्किनवर संचालित आहेत. ज्यामधून युजर्सना सुलभ व गतीशील सॉफ्टवेअर यूएक्ससह रिफ्रेश आयकॉन्स, नवीन डिझाइन, रिफ्रेशिंग वॉलपेपर्स आणि सुलभ पोहोचसाठी इंटरअॅक्शन क्षेत्राची खात्री मिळते. या स्मार्टफोन्समध्ये बिल्ट-इन वैशिष्ट्ये आहेत जसे खाजगी अॅप्स, मेसेज नोटिफिकेशन्स व मीडिया सुरक्षित ठेवण्यासाठी एक्सहाइड; सुधारित सुरक्षिततेसाठी थेफ्ट अलर्ट, पीक प्रूफ आणि किड्स मोड.

नोट ११ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स, एफ/१.६ लार्ज अर्पेचर, परिपूर्ण पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करण्यासाठी सेकंडरी लेन्ससह २ मेगापिक्सल डेप्‍थ सेन्सर आणि एआय लेन्ससह क्वॉड एलईडी फ्लॅश आहे. नोट ११एस मध्ये ५० मेगापिक्सल एआय ट्रिपल रिअर कॅमेरासह समर्पित २ मेगापिक्सल माक्रो लेन्स, २ मेगापिक्सल डेप्थ लेन्स आणि क्वॉड-एलईडी फ्लॅश आहे. दोन्ही डिवाईसच्या पुढील बाजूस १६ मेगापिक्सल एआय सेल्फी कॅमेरासह ड्युअल-एलईडी फ्लॅश आहे. नोट ११ व नोट ११एस मध्ये हेवी-ड्युटी ५००० एमएएच बॅटरी आहे, जी स्मार्टफोनला दीर्घकाळापर्यंतच्या वापरादरम्यान कार्यरत ठेवते. नोट ११ व नोट ११एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ३३ वॅट चार्जिंग सपोर्टसह टाइप सी चार्जर आहे.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अनिश कपूर म्हणाले, “दोन्ही स्मार्टफोन्ससह इन्फिनिक्स भारतातील सर्वसमावेशक गेमिंग समुदायापर्यंत पोहोचत त्‍यांचा गेमिंग अनुभव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नोट ११ सिरीज वि‍कसित करत आम्ही गेमसाठी सुसज्ज व किफायतशीर किंमत असलेले तडजोड न करणारे डिवाईसचे परिपूर्ण संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. नोट ११ सिरीज युजर्सना सर्वात प्रगत प्रोसेसर व आधुनिक तंत्रज्ञान देते.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.