एमजी मोटर लाँच करणार इलेक्ट्रिक कार ; काय आहे किंमत जाणून घ्या

0

मुंबई– एमजी मोटर इंडिया देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रामधील आपली भूमिका अधिक सुधारित करण्‍यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या शेवटी १० ते १५ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रिक कार (वेईकल) लाँच करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्हीची विक्री करणारी कंपनी जागतिक व्यासपीठावर आधारित इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर वेईकल लाँच करेल.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “एसयूव्ही अॅस्टरनंतर आमच्या पुढील उत्पादनासंदर्भात आम्ही ईव्हीबाबत विचार करत आलो आहोत आणि आता आम्हाला सरकारकडून स्पष्ट अभिप्रायासह प्रेरणा मिळाली आहे की, ईव्ही भविष्य असणार आहे.आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ईव्ही सादर करणार आहोत. या वेईकलची किंमत १० लाख ते १५ लाख रूपयांपर्यंत असेल आणि वैयक्तिक इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागावर लक्ष्य करेल.”

श्री. छाबा पुढे म्हणाले, “ही एक आगळीवेगळी क्रॉसओव्हर आहे आणि ही वेईकल जागतिक व्यासपीठावर आधारित असणार आहे, जे आम्ही विकसित करणार आहोत. तसेच ही भारतासह सर्व उदयोन्मुख बाजारपेठांमधील मास मार्केटसाठी ईव्ही असणार आहे. आम्ही श्रेणी, भारतीय नियमन व ग्राहकांच्या आवडीनुसार या कारला सानुकूल करू. ही वेईकल विशेषत: भारतीयांसाठी डिझाइन करण्यात येईल. आम्ही लवकरच या वेईकलवर काम करण्यास सुरूवात करणार आहोत. आम्ही १० लाख रूपये ते १५ लाख रूपयांदरम्यान किंमत असलेली कार डिझाइन करू शकलो तर त्यामधून आम्हाला उत्तम उत्पन्न मिळू शकेल. म्हणून आशा करतो की, ही आम्हाला उत्तम उत्पन्न मिळवून देणारी ईव्ही कार असेल.

छाबा पुढे म्हणाले की, “ऑटो विभागासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक (पीएलआय) संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करण्यासाठी एमजी मोटर इंडिया तिच्या आगामी ईव्हीमध्ये अनेक स्थानिक पार्टसचा वापर करेल. यामध्ये बॅटरी असेम्ब्ली, मोटर्स आणि इतर पार्टसचे स्थानिकीकरणाचा समावेश असेल. एमजी मोटर इंडियाची इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील इतर ऑफरिंग झेडएस ईव्ही दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे आणि त्यांची किंमत २१ लाख रूपये व २४.६८ लाख रूपये (एक्स-शोरूम) आहे.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.