नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना जनतेसाठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.कोरोना विरोधातील लढाईत भारताने मोठे यश मिळवले आहे.देशात ओमिक्रॉनला प्रमाण वाढत असले तरी आपण कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहोत. ओमिक्रॉनचे प्रमाण जरी वाढत असले तरी जनतेने पॅनिक होऊ नका नोझल व्हॅक्सीन सुद्धा लवकर उपलब्ध होणार असून ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही.केवळ सतर्क राहा आणि कोरोनाचे नियम पाळा तसेच असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले.
आज पंतप्रधानांनी देशवासियांसाठी तीन महत्वाच्या घोषणा केल्या आहे.
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरणाला सुरुवात
फ्रंट लाईन व हेल्थ केअर वर्कर्स यांच्या साठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस मिळणार
६० वर्षांवरील ज्येष्ठाना डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस १० जानेवारी २०२२ पासून मिळणार आहे
Pm साहेब दिलासा देताय चांगलं आहे नाहीतर आता करायचं काय ह्या नेमीच्या लाटांनी ,बुडून जाणार का सगळं?